लखीमपूर :- रिल्स बनवण्याच्या वेडाने सध्याची तरुण पिढी इतकी झपाटली आहे की स्वत:च्या जिवाचीही पर्वा करताना दिसत नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काय वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते.आपल्या रिल्सला जास्तीत जास्त व्ह्यूज मिळावेत यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालतातच पण इतरांच्या जिवालाही धोकाक पोहोचवतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रिल्सचं वेड एका कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. रेल्वे रुळावर उभं राहू पती-पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलासह रिल्स बवनत होते. त्याचवेळी वेगाने येणाऱ्या ट्रेनने जोरदार धडक दिली आणि यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

रिल्स बनवणं बेतलं जीवावर
ही दुर्देवी घटना उत्तर प्रदेशमधल्या लखीमपूर इथली आहे. लखनऊ-पीलीभीत रेल्वे मार्गावर बुधवारी ट्रेनच्या धडकेत पती-पत्नी आणि तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पती आणि पत्नी आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन रेल्वे रुळाच्या बाजूला उभं राहून मोबाईलवर रिल्स बनवत होते. त्याचवेळी लखनऊकडून येणाऱ्या ट्रेनने पती-पत्नीला जोरदार धडक दिली. पती-पत्नी रिल्स बनवण्यात इतके मग्न होते, की मागून वेगाने येणाऱ्या ट्रेनचंही त्यांना भान राहिलं नाही. त्यांच्याबरोबर 3 वर्षांच्या चिुमरड्याचाही नाहक बळी गेला. रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेलं कुटुंब हे सीतापूर जिल्ह्यातील लहरपूर गावातील होते. मृतांमध्ये 30 वर्षांच्या अहमद, पत्नी नाजनी (25) आणि तीन वर्षांचा मुलगा अकरम यांचा समावेश आहे. ओयल रेल्वे स्थानका जवळच ही दुर्देवी घटना घडली.

कसा घडला अपघात?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लहरपूर गावात राहाणारा अहमद, पत्नी नाजनीन आणि मुलगा अकरम यांच्याबरोबर फिरण्यासाठी बाहेर पडला. फिरता-फिरता ते ओयल रेल्वे स्थानकाजवळ पोहोचले. रेल्वे रुळाजव अहमद आणि नाजनीन यांनी रिल्स बनवण्याचं ठरवलं. अहमदने आपल्या मोबाईलने रिल्स बनवायला सुरुवात केली. त्यावेळी चिमुरडा नाजनीनच्या हाताता होता. यादरम्यान लखनऊ-पीलीभीत पॅसेंजर येत होती. पण या दोघांनाही त्याचं भान नव्हतं. शेवटी व्हायचं तेच झालं. ट्रेनच्या धडकेत तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिले. त्यानंतर ट्रेन रवाना झाली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार बराचवेळ पती-पत्नी रेल्वे रुळावर रिल्स बनवत होते. काही जणांनी त्यांना ट्रेन येऊ शकते असं सांगितलंही. पण याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.
हे पण वाचा
- Viral Video :”तू माझ्या आईला शिवीगाळ कशी काय करू शकतेस?” एकमेकींच्या झिंज्या उपटत दोन महिलांमध्ये तुफान राडा पहा व्हिडिओ.
- अपूर्ण अवस्थेतील घरकुल योजना पूर्ण करून बेघरवासीयांना घरकुले मिळून द्यावीत; एरंडोल येथील घरकुलांचे भिजत घोंगडे सोडण्याची आमदार अमोलदादा पाटील यांच्याकडे मागणी.
- घरगुती गॅस सिलिंडर मधून बेकायदेशीरपणे वाहनात गॅस भरणाऱ्या टोळीवर अमळनेर पोलिसांच्या छापा, 38 गॅस सिलिंडर जप्त, चौघांना अटक.
- जळगाव एलसीबीच्या पथकाने बाहेर जिल्ह्यातील अट्टल दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या; चार दुचाकी जप्त.
- Viral Video: गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरुजींचा घृणास्पद प्रकार विद्यार्थ्यांना चक्क….. पहा संतापजनक व्हिडिओ.