धुळे :- शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी त्यांच्या अकाउंटंट नीलेश अग्रवाल विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली आहे. बनावट सह्या व नोंदी करून 51 लाख 50 हजारांची रक्कम नीलेश अग्रवालने परस्पर खात्यात काढून घेत गैरव्यवहार केल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.आमदार अनुप अग्रवाल यांचे वडील ओमप्रकाश पुरणमल अग्रवाल यांच्या तक्रारीनुसार, नरेशकुमार अँण्ड कंपनी आणि गणेश एंटरप्रायजेस या भागीदारीमध्ये असलेल्या फर्म आहे. त्यांचे गरुड बाग येथील धुळे विकास सहकारी बँकेत करंटं खाते आहे. अग्रवाल कुटुंबीयांनी नीलेश कचरूलाल अग्रवाल यांच्याकडे अकाउंटंट म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्याचा गैरफायदा घेत नीलेश अग्रवाल यांनी बँक खात्याच्या चेकबुकचा दुरुपयोग केला. शिवाय त्यावर बनावट सह्या करून सुमारे 51 लाख 50 हजार रुपये परस्पर काढून घेतले.
तसेच या रकमेतून नीलेश अग्रवाल यांनी कुटुंबीय व नातलगांच्या नावे मालमत्ता घेतली. त्यातून ओमप्रकाश अग्रवाल यांच्यासह फर्ममधील इतर भागीदारांची फसवणूक झाली. हा प्रकार 1 एप्रिल 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या दरम्यान झाला. त्यानुसार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
फसवणुकीची व्याप्ती दीड कोटींवर
यापूर्वी नीलेश अग्रवाल विरोधात चिरायू ट्रेडिंग कंपनीला 61 लाख तर टॉपलाइन फूड्सला 54 लाख 50 हजार रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार आहे. त्यानंतर आता नरेशकुमार अँण्ड कंपनी व गणेश एंटरप्रायजेसला 51 लाख 50 हजारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. तिघा घटनांची व्याप्ती पाहता नीलेश अग्रवाल याने एक कोटी 67 लाखांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
- Viral Video: गावातील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत गुरुजींचा घृणास्पद प्रकार विद्यार्थ्यांना चक्क….. पहा संतापजनक व्हिडिओ.
- सराफाला ‘लाईव्ह लोकेशन’ मिळवून लुटले, 3 लाख नेल्याची पोलिसात फिर्याद, पोलिसांनी 7 चोरट्यांना पकडले अन् त्यांच्या कडून जप्त केले 2.5 कोटी.
- 55 वर्षीय नराधम उपसरपंचाने केलेल्या अत्याचारानंतर 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी राहिली गर्भवती प्रकरण दाबण्यासाठी केले धक्कादायक कृत्य.
- साखरपुड्यात नवरीने प्रियकराला मारली मिठी, नवरदेवाने लग्नाला दिला नकार नवरीची धमकी “लग्न कर नाहीतर हुंडा प्रकरणात अडकवेन”,ITअधिकारी असलेल्या नवरदेवाने संपवलं जीवन
- धरणगाव तालुक्यात वडिलांच्या खुनाचा राग मनात धरून सिनेस्टाईल पाठलाग करून कपाळाच्या मधोमध गोळी झाडून केली हत्या.