धर्मपरिवर्तन,घराची जागा दान करणार,अन्य लोकांना हे मान्य नाही देत होते त्रास, म्हणून भावाने आईसह 4 बहिणींची केली हत्या?

Spread the love

आग्रा :- देशाला हादरवणारी घटना समोर आली आहे. लखनऊमध्ये एका भावाने आपल्या आई आणि चार बहिणींची ब्लेडने वार करून हत्या केली. प्राथमिक तपासात ही हत्या घरगुती वादातून झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता.पिता-पुत्रांनी हत्याकांडाच्या आधी मोठी घोषणा केली होती. दोघांनीही कुटुंबासह इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा केली होती.
आपल्या घरात राम मंदिर बांधण्याची लेखी घोषणा केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मालमत्ता हिंदू ट्रस्टला देण्याचा निर्णयही त्यांनी घेतला होता. मोहम्मद बदर याने या हत्याकांडाच्या १४ दिवस आधी म्हणजेच १८ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले होते. पत्राच्या प्रती जिल्हा दंडाधिकारी आग्रा, पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त शहर, सहाय्यक पोलिस आयुक्त, ट्रान्स यमुना पोलिस ठाण्याचे प्रभारी यांना देखील पाठवल्या होत्या. पत्रात लिहिले होते की, ‘मी मोहम्मद बदर, आग्रा येथील ट्रान्स यमुना पोलिस स्टेशनच्या इस्लाम नगरमध्ये घर क्रमांक १८३ मध्ये राहतो. आम्ही मुस्लिम समाजातून येतो. आमचे शेजारी आणि त्यांचे नातेवाईक खूप भांडखोर आणि दमदाटी करणारे आहेत. मी माझ्या घरात एक छोटेसे किराणा दुकान चालवून माझा उदरनिर्वाह करत आहे. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी त्यांच्या नातेवाईकांसोबत कट रचून त्यांचा ऑटो दुकानावर घातला. त्यामुळे माझी छोटी मुलगी आलिया (वय 9) हिच्या हाताला दुखापत झाली. दुकानाचे नुकसान झाले. या घटनेची पोलिस ठाण्यात नोंद केली. मात्र तक्रारीनंतर पोलिसांनी आमच्यात तडजोड घडवून वाद मिटवला.

दोन दिवसांनी 18 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता सर्व आरोपी जमले आणि आमच्या घरी आले आणि त्यांनी घरावर विटा आणि दगडफेक करण्यास सुरुवात केली. तसेच माझ्या मुलीसोबत गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. आम्ही विरोध केला तर त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आम्ही 112 ला दोनदा कॉल केला. यावर दोन पीआरव्ही वाहने घटनास्थळी आली. मात्र, पोलिसांनी हल्लेखोरांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट पोलिस आम्हाला शिव्या देऊन निघून गेले. त्यामुळे मी आणि माझे संपूर्ण कुटुंब अतिशय अस्वस्थ आणि दुःखी झालो आहे. शेजारी हे अतिशय दुष्ट लोक असून अवैध धंदे करतात. आमच्याशी रोज भांडतात. अशा परिस्थितीत माझं कुटुंब आणि सर्व मुलांना हिंदू धर्म स्वीकारण्यास भाग पडत आहे. आम्ही मुस्लिम धर्माचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारण्याची घोषणा करतो आणि आमच्या घरात बांधलेल्या दुकानात मी श्री रामाचे मंदिर बांधतो.

आमच्या स्वतःच्या आणि आमच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा विचार करून आम्ही हे पाऊल उचलले आहे. मी माझ्या मुलांसह बाहेर फिरत आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झाले तर त्याची जबाबदारी शेजाऱ्यांची असेल. माझी सर्व मालमत्ता हिंदू टेम्पल ट्रस्टची असेल. माझी विनंती आहे की ट्रान्स यमुना पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना माझा अहवाल नोंदवून आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. दरम्यान, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी