देवाला अभिषेकासाठी पाणी आणायला गेलेल्या दोघांचा गोदापात्रात बुडून मृत्यू

Spread the love

बीड – देवाला अभिषेकासाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या दोघांचा गोदापात्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील राजापूर येथे घडली. शिवाजी इंगोले आणि मोहन आतकरे अशी मृत्यू पावलेल्या दोघांची नावे आहेत.

निपाणी जवळका येथील रहिवासी शिवाजी आणि मोहन हे दोन मित्र आपल्या अन्य मित्रांसोबत खंडोबाच्या यात्रेनिमित्त राजापूर या ठिकाणी गोदावरी पात्रात देवाला अभिषेक करण्यासाठी रात्रीच्या वेळी गंगेचं पाणी आणायला गेले होते. यावेळी हे तरुण खोल पाण्यात बुडाले. या दुर्घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मध्यरात्रीपासून या दोघांचा गोदावरी पात्रात शोध सुरू होता आणि आता या दोघांचे मृतदेह नदीपात्रात आढळून आले आहेत. उत्सवाच्या दिवशी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने निपाणी जवळका गावावर शोककळा पसरली आहे.

टीम झुंजार