झुंजार प्रतिनिधी प्रशांत सरवदे सावदा: – रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे अवैद्य गोवंशाची वाहतूक होत असल्याची गोरक्षकांना माहिती मिळाल्याने गोवंशाची सुटका करण्याकरता गोरक्षकांनी गाडी ला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोठे वाघोद्यातील काही समाज कंटकांनी या गाडीवाल्याला अभय देत गोरक्षकांवर तुफान दगडफेक करून त्यांना मारहाण केली. संतप्त झालेल्या गोरक्षकांनी मोठा वाघोदा या ठिकाणी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा त्यांना अटक करा यासाठी सुमारे दोन तास बुरहानपुर अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदा येथे रास्ता रोको केला. या घटने वेळी बाचाबाचीत वाद सोडविण्यास गेलेल्या वाघोदा येथील पोलीस पाटील गणेश भोसले यांना सुद्धा समाज कंटक यांनी मारहाण केली व त्यांचे जवळील वस्तू जबरदस्तीने काढून घेतल्या.
वाघोदा, निंभोरा, चिनावल, पाल, सावदा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास पणे अवैध गोवंश वाहतूक तसेच त्यांची कत्तल होत आहे. याला पाय बंद घालण्यासाठी परिसरातील गोरक्षकांनी गोवंश वाहतूक व परिसरातील कत्तलखाने बंद करण्याचा प्रयत्न करीत आहे.
त्यातच आज अवैद्यरित्या गोवंश वाहतुकीची गोरक्षकांना माहिती मिळाल्याने त्यांनी सदर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाघोदा येथे गोरक्षकांवरच हल्ला करण्यात आल्याने वाघोदा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पवन दासजी महाराज, ह.भ.प धनराज महाराज अंजाळेकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री योगेश भंगाळे, पंकज नारखेडे, राहुल पाटील, संजय माळी, मनीष भंगाळे, योगेश बोरोले, सुरेंद्र न्हावी, स्वप्नील पवार, डॉ चंद्रशेखर पाटील, ऍड कालिदास ठाकूर यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या ना तात्काळ अटक करा अशी मागणी केली.
परिसरातील अवैध गोवंश वाहतूक बंद करा याबाबतची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली असून सदर प्रकार एक महिन्याच्या आत बंद न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले जाईल व मी स्वतः आंदोलन करेल असे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी केले.
दरम्यान सावदा पोलिस स्टेशनला, आमदार अमोल जावळे, आमदार चंद्रकांत पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी भेट दिली. पोलिस स्टेशन मार्फत संध्याकाळी उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, सावदा स.पो.नि. विशाल पाटील, निभोरा स.पो.नि हरदास बोचरे सावदा पोलीस स्टेशन पोलीस व परिसरातील पोलिसांनी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होतें.
दरम्यान या प्रकरणी ४जणांना ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी वाघोदा पोलीस पाटील गणेश भोसले यांचे तर्फे फिर्याद देण्याचे काम सुरू होते तर उशिरा पर्यन्त गोतस्करांना मदत करीत पळून जाण्यास मदत करणारे समाज कंटक यांचेवर देखील फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते, तर ज्या गाडीतून ही अवैध गो तस्करी सुरू होती त्याची नंबर प्लेट वरून तपास घेण्याचा पर्यन्त केला असता ती सुद्धा बनावट होती व ती एका मोटार सायकलचा नंबर असल्याचे समजून आले.