धक्कादायक ! निर्वस्त्र करून महिलेचा छळ, व्हायरल व्हिडिओने खळबळ

Spread the love

नंदुरबार : महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नंदुरबार जिल्ह्यात घडली आहे. महिलेला निर्वस्त्र करून तिचा छळ करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही घटना सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओतून समोर आली आहे. आता या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तपासही सुरू केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नंदुरबारच्या सोशल मीडियात हे व्हिडिओ व्हायरल होत आहे. या घटनेवरून प्रशासनावर आता जोरदार टीका होत आहे.बोली भाषेवरून ही घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. ही घटना कुठली आणि संबंधीत पीडित महिला कोण? याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत.

हे धक्कादायक प्रकरण समोर आल्यानंतर राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचे ‘अंनिस’ने स्पष्ट केले आहे. नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातूनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याचे बोलल्या जात आहे.

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, हे निष्पन्न झाल्यानंतर आरोपींविरुद्ध कठोर कारवाई निश्चितपणे केली जाईल, अशी माहिती धडगावचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताळे यांनी दिली.

टीम झुंजार