चाळीसगावात मोठी कारवाई; स्कार्पिओ गाडीत पकडला 13 लाखाचा गांजा !

Spread the love

चाळीसगाव प्रतिनिधी – धुळेहून चाळीसगावकडे येणाऱ्या एका स्कार्पिओ गाडीवर संशय येताच त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात 13 लाख रुपये किंमतीचा 62 किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला आहे. याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहर वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस संयुक्तपणे धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर सोमवार, 18 एप्रिल रोजी संध्याकाळी गस्त घाललेले असताना त्यावेळी एक विना नंबर असलेल्या पांढऱ्या कलरची स्कार्पिओ गाडी आली. त्यावेळी गाडीत उग्र वास आल्याने त्याची अधिक तपासणी केली असता. त्यात बेकायदेशीर विक्रीसाठी असलेला मुद्देमाल 13 लाख 36 हजार चारशे रुपये किंमतीचा 62.0066 किलो वजनाचा गांजा मिळून आला. त्यावर ग्रामीण पोलीस व शहर वाहतूक शाखांनी सदर मुद्देमाल हस्तगत करून तुषार अरूण काटकर (वय – 28 रा. दत्तवाडी ता. चाळीसगाव) व सुनिल देविदास बेडीस्कर ( वय – 38 रा. पिलखोड ता. चाळीसगाव) या दोघांना ताब्यात घेतले आहे. हि कारवाई सोमवार, 18 एप्रिल रोजी संध्याकाळी धुळे रोडवरील विराम लॉन्स समोर करण्यात आली. तत्पूर्वी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण पोलीस धडाकेबाज कामगिरी करीत आहेत. यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

सदर कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय अधिकारी कैलास गावडे व पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे सपोनि तुषार देवरे, ग्रामीण पोलीस स्टेशनचे सपोनि रमेश चव्हाण, वाहतूक शाखेचे पोहेकाँ श्रीराम पोपट बोरसे, पोना सचिन देविदास अडावदकर, पोना बापू काशिनाथ पाटील, पोना दिपक पितांबर पाटील, पोना नरेंद्र महादू पाटील, चालक पोहेकॉ रावसाहेब नामदेव पाटील त्याचप्रमाणे चाळीसगाव ग्रामीणचे पोना शांताराम सिताराम पवार, पोना गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना ज्ञानेश्वर काशिनाथ बडगुजर, पोना देविदास संतोष पाटील, पोना दिनेश विक्रम पाटील, पोना प्रेमसिंग नरसिंग राठोड व चालक सफौ अनिल आगोणे आदींनी केली आहे.

टीम झुंजार