दोन्ही लहान मुले आणि चित्रा शिंदे घरात नसल्याने सर्वांनी शोधाशोध केली असता शेजारीच असलेल्या किसन खरात यांच्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास सर्वांचे मृतदेह आढळून आले.
सांगोला: अज्ञात कारणाने आपल्या पोटच्या दोन मुलांसह आईने विहिरीत उडी मारून आपली आणि आपल्या दोन्ही मुलांची जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना हबिसेवाडी (ता. सांगोला) येथे सोमवारी रात्री घडली.चित्रा हणमंत शिंदे (वय २७), मुलगा स्वराज हणमंत शिंदे (वय साडेतीन वर्षे) व मुलगी हिंदवी हणमंत शिंदे (वय दीड महिना, रा. हबिसेवाडी, ता. सांगोला) असे या घटनेत मृत्यू झालेल्या आई व चिमुकल्यांची नावे आहेत.योगेश शहाजी गळवे (रा. हबिसेवाडी, ता. सांगोला, सध्या रा. न्यू पनवेल, नवी मुंबई) यांनी दिलेल्या खबरीनुसार सोमवारी रात्री अचानक अज्ञात कारणावरून चित्रा शिंदे ही दोन्ही मुलांसह आपल्या घरातून निघून गेली. दोन्ही लहान मुले आणि चित्रा शिंदे घरात नसल्याने सर्वांनी शोधाशोध केली असता शेजारीच असलेल्या किसन खरात यांच्या विहिरीत सोमवारी मध्यरात्री पावणे बाराच्या सुमारास सर्वांचे मृतदेह आढळून आले.
याप्रकरणी योगेश शहाजी गळवे (रा. हबिसेवाडी, ता. सांगोला, सध्या रा. न्यू पनवेल, नवी मुंबई) यांनी सांगोला पोलिसांत खबर दिली असून, पोलिस तपास करीत आहेत.