लहान भाऊ,प्रेयसी आजी, काका,काकु कुटुंबातील ५ जणांची केली हत्या; स्वतः विष पिऊन 23 वर्षीय तरुण पोलीस स्टेशनमध्ये हजर ‘ना पश्चात्ताप,ना डोळ्यात अश्रू’..

Spread the love

तिरुअनंतपुरम :- केरळची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका 23 वर्षांच्या तरुणाने नैराश्यातून कुटूंबातील पाच जणांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी, भाऊ, आजी आणि नातेवाईकांसह 5 जणांची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाणे गाठलं अन् हत्येची कबुली दिली. त्यावेळी आरोपीने स्वत: विष प्राशन केलं होतं. त्यानंतर पोलिसांची देखील धावपळ झाली. नेमकं काय काय झालं? जाणून घ्या संपूर्ण स्टोरी

नेमकं काय काय झालं?

खून करण्यापूर्वी तो त्याच्या धाकट्या भावाला त्याचं आवडतं जेवण खाण्यासाठी एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथं त्याने भावाला कुळीमंथीला खायला दिलं. अहसनला त्याचं आवडता पदार्थ खाताना आनंदाची सीमा नव्हती. पण निष्पाप अहसनला कल्पनाही नव्हती की त्याला इतक्या प्रेमाने जेवू घालणारा भाऊ काही क्षणांनी त्याची निर्घृण हत्या करणार आहे. हॉटेलमध्ये जेवल्यानंतर, अहसान त्याच्या भावासोबत आनंदाने घरी परतला आणि त्यानंतर अफानने त्याची निर्घृण हत्या केली. दुसरा नंबर होता प्रेयसीचा… अफानने त्याच्या प्रेयसीलाही घरी बोलावलं होतं. धाकट्या भावाची हत्या केल्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीचीही हत्या केली.

ना पश्चात्ताप, ना डोळ्यात अश्रू…

दोन खून झाल्यानंतरही अफानची चाकूची तहान भागली नाही. वेंजारामूडू नंतर तो पांगोडेला पोहोचला. त्याची आजी इथे राहत होती. वृद्ध आजी सलमा बीवी एकट्या होत्या. घरात प्रवेश करताच त्याने एकाच झटक्यात गळा चिरला. स्वतःच्याच लोकांना स्वतःच्या हातांनी मारल्याबद्दल त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप नव्हता, ना डोळ्यात अश्रू… आजीला मारल्यानंतर त्याने आईकडे गेला अन् जन्म देणाऱ्या आईला संपवण्याचा प्रयत्न केला. पण आईचा जीव वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं आहे. आरोपीच्या आईची परिस्थिती सध्या नाजूक आहे.

रक्ताने माखलेला अफान पोलीस स्टेशनमध्ये गेला…

तीन खून केल्यानंतर अफान आता एसएन पुरममध्ये पोहोचला. तिथं निवृत्त सीआरपीएफ अधिकारी काका लतीफ आणि काकू शाहिदा राहत होते. तिथं त्याने दोघांची हत्या केली. पाच खून केल्यानंतर रक्ताने माखलेला अफान आरामात वेंजारामूडू पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. मी माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं आहे. एवढंच बोलून तो गप्प बसला. अफानची स्टोरी ऐकल्यावर पोलीस देखील चक्रावले.

…म्हणून प्रेयसीला संपवलं

पोलीस चौकशीत अफानने सांगितले की तो खूप कर्जात बुडाला होता. त्याचा परदेशातील सुटे भागांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला होता. लाखो रुपये बुडाले, कर्जदारांचा दबाव वाढत होता. तो इतका खचला होता की त्याला आता जगण्यात काही अर्थ नाही असं वाटू लागलं होतं. माझ्या मृत्यूनंतर माझी प्रेयसी एकटी पडली असती म्हणून मी तिला पण संपवलं असं अफानने सांगितलं. पोलिसांना कबुली देताना आपण देखील विष प्राशन केल्याचं सांगितलं अन् पोलिसांची भंबेरी उडाली.

अफान मानसिक आजाराने ग्रस्त?

दरम्यान, पोलिसांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. सध्या अफानची प्रकृती चिंताजनक आहे. या हल्ल्यात अफानची आई शमीना गंभीर जखमी झाली आहे. त्याला तिरुअनंतपुरम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती गंभीर आहे. अफान मानसिक आजाराने ग्रस्त आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत.

मुख्य संपादक संजय चौधरी