माणुसकीला काळीमा ; तेलंगणामध्ये अल्पवयीन मुलीवर तब्बल ८० जणांनी केला बलात्कार

Spread the love

गुंटूर – माणुसकीला काळिमा फासणारी घटना तेलंगणामध्ये घडली आहे. येथील गुंटूर भागात किशोरवयीन असणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १३ वर्षाच्या मुलीवर आठ महिन्यांत तब्बल ८० हून अधिक पुरुषांनी सामूहिक बलात्कार केल्याचे समोर आले आहे. गुंटूरमधल्या पोलिसांनी मंगळवारी या मुलीची सुटका केली आहे. या प्रकरणी मंगळवीरी १० जणांना अटक करण्यात आली आहे.ह्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींच्या मुलांची नावे आहेत,असे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

पीडित तरुणीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. पोलिसांना गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे. पोलिसांनी तपास केला असता आठ महिन्यात तब्बल ८० जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी सर्व ८० नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. यापैकी पोलिसांनी मंगळवारी १० जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्याचाही समावेश आहे. अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

टीम झुंजार