प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर तालुक्यातील पाडळसरे येथून जवळच असलेल्या जैतपीर येथील ३५ वर्षीय युवकाने बेरोजगारीला कंटाळून वैफल्यग्रस्त होऊन रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. प्रविण गणेश पाटील असे मृत युवकाचे नाव आहे. हि घटना घडली तेव्हा मृत युवकाचे कुटुंबीय भवानी मातेच्या यात्रेला गेले हाेते.यात्रेच्या दिवशीच गावातील तरुणाने आत्महत्या केल्याचे यात्रेवर विरजण पडले.
११ राेजी गावातील भवानी मातेची यात्रा होती. त्यात नवस फेडण्यासाठी आलेल्या निमंत्रणावर आई, भाऊ, वहिनी जेवायला गेल्याचे पाहून अविवाहित व बेरोजगारीने वैफल्यग्रस्त झालेल्या धाकटा मुलगा प्रवीणने मित्रांकडे नोकरीं नसल्याने काय करावे, नोकरीं नाही तर छोकरी पण मिळणार नाही असे बोलून दाखवल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. याच चितेंतून प्रविण याने गावाच्या शेजारीच असलेल्या सुरत भुसावळ रेल्वे लाइनवर सुरत कडून येणारी रेल्वे समोर झोकून दिले.
यात त्यांचा मृत्यू झाला.भोरटेक स्टेशनचे मास्तर अविनाश पाटील यांना लाईनमनने दिल्याने त्यांनी पोलीस पाटील गोविंदा शिंदे यांना कळवले. याबाबत पोलिस पाटील गोविंदा शिंदे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पीएसआय विनोद पाटील हे करीत आहेत. मृत प्रविण च्या पश्चात वृद्ध आई, भाऊ वहिनी असा परिवार आहे