एरंडोल :- श्रीक्षेत्र पदमालय (श्रीगणपती मंदीर) ते श्रीक्षेत्र शिर्डी (श्री साईबाबा मंदीर) अशी बस सुरू व्हावी, यासाठी मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील हे सातत्याने पाठपुरावा करित होते. त्यांचा केलेल्या पाठपुराव्याचा अनुषंगाने राज्याचे परिवहनमंत्री मा.ना.प्रतापरावजी सरनाईक साहेब यांची गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भेट घेत सदरील बस सुरू करण्याबाबत संबंधितांना योग्य ते आदेश देण्याबाबत विनंती केली होती. आज या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असुन मा.आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांची स्वप्नपुर्ती देखील होत आहे.
आज श्रीक्षेत्र पदमालय (श्रीगणपती मंदीर) ते श्रीक्षेत्र शिर्डी (श्री साईबाबा मंदीर) (मार्ग – श्रीक्षेत्र पदमालय – एरंडोल – भडगांव – कोळगांव – गुढे – बहाळ – मेहुणबारे – दरेगांव – पिलखोड – सायगांव – नांदगांव – येवला – कोपरगांव – श्रीक्षेत्र शिर्डी) या पदमालय एक्सप्रेसचा शुभारंभ करत हिरवा झेंडा दाखवत मार्गस्ती केले. यामुळे आता मतदारसंघातील श्रीसाई भक्तांसह मध्यस्तीच्या ठिकाणांत दळणवळण करण्यासाठी प्रवाशांना सोयीचे होणार आहे. ही बस सुरू झाल्याने श्रीसाई भक्तांसह प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण दिसुन येत आहे.
या केलेल्या विनंतीची राज्याचे परिवहनमंत्री मा.ना.प्रतापरावजी सरनाईक साहेब, जळगांव विभागाचे विभाग नियंत्रक जगनोर साहेब, एरंडोल आगाराचे आगारप्रमुख यांनी दखल घेतल्याबद्दल त्यांचे देखील यावेळी आभार मानले.प्रसंगी शुभारंभा प्रसंगी धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड यांचेसह एरंडोल आगाराचे आगार प्रमुख, या बसचे चालक व वाहक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.