पत्नीला सोशल मीडियावर रील्सचा नाद, इतर पुरुषांनी लाईक केल्याने पतीचा राग झाला अनावर दोघांत झाला वाद,पत्नीने असे केले की विचारही करू शकत नाही.

Spread the love

शहडोल:- मध्य प्रदेशच्या शहडोलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पतीची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं आहे. खून करणारी महिला सोशल मीडियावर सक्रिय होती.तिचे रील्स पुरुषांनी लाईक केल्यावर तिच्या नवऱ्याला प्रचंड राग यायचा. या मुद्द्यावरुन झालेल्या भांडणानंतर तिने चक्क पतीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तिने पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर घडलेला सगळा प्रकार समोर आला आणि पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघांचंही दुसरं लग्न होतं. फेसबुकद्वारे दोघांची मैत्री झाली होती.

हत्येची ही घटना 21 एप्रिलच्या रात्री घडली. मृत व्यक्तीचं नाव सुरेश बैगा आहे. तर त्याच्या पत्नीचं नाव राधा कोल असं आहे. राधाने तिच्या पतीचा गळा दाबून खून केला होता. पण आपण खून केलाय ही गोष्ट लपवण्यासाठी तिने शेजाऱ्यांना खोटं सांगितलं. तिने सांगितलं की, सुरेश खूप दारू पिऊन आला. तो धड जेवलाही नाही आणि आता तो उठत नाही. शेजाऱ्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा सुरेशचा मृत्यू झाल्याचं समजलं. पत्नीने पोलिसांनाही खोटं सांगितलं.पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेहाची तपासणी केली. मृताच्या गळ्यावर नखांचे ओरखडे दिसले. त्यामुळे पोलिसांना खूनाचा संशय आला. त्यांनी सुरेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. संशयाच्या आधारे पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने गुन्हा कबूल केला.

राधाने पोलिसांना सांगितलं की, सुरेश हा तिचा दुसरा नवरा होता. पहिल्या नवऱ्यापासून तिला पाच वर्षांची मुलगी आहे. पहिला पती खूप त्रास देत होता. त्यामुळे ती माहेरी राहायला आली. याच काळात फेसबुकवर तिची ओळख सुरेशशी झाली. तो तिचे रील्स लाइक करत होता. त्यांच्यात आधी मैत्री निर्माण झाली आणि नंतर ते एकमेकांवर प्रेम करु लागले.

सुरेशने त्याचं एक लग्न झाल्याचं राधाला सांगितलं होतं. दोघे आधी लिव्ह-इन रिलेशनमध्ये राहत होते काही दिवसांनी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर सुरेश तिच्यावर सतत संशय घेऊ लागला. तिच्या रील्सवर कोणत्याही पुरुषाने लाईक केलं तर तो राधावर रागवायचा आणि तिला शिवीगाळ करायचा. अनेकदा दारू पिऊन मारहाणही करत होता.ज्या दिवशी सुरेशची हत्या झाली त्यादिवशीदेखील त्याने दारू प्यायली होती. त्याने राधासोबतच तिच्या मुलीवर हात उचलला. त्यामुळे राधाला राग आला आणि तिने सुरेशची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर पोलिसांना आणि शेजाऱ्यांना तिने खोटं सांगितलं. पण पोलिसांनी अखेर सगळ्या प्रकरणाचा छडा लावला.

मुख्य संपादक संजय चौधरी