खळबळजनक ! मंत्री शंकरराव गडाख यांच्या स्वीय सहाय्यकावर गोळीबार

Spread the love

अहमदनगर : शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या पीएवर गोळीबार करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यात हा हल्ला झाला. या घटनेत पीए राहुल राजळे हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोधही सुरू आहे.

दरम्यान हा हल्ला का करण्यात आला, त्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही, राजळे यांच्यावर हल्ला कोणी केला हे देखील स्पष्ट होऊ शकलेले नाही. काल रात्री घोडेगावमध्ये अज्ञाताकडून राजळे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या राजळे यांच्यावर अहमदनगरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी नाकेबंदी केली. आरोपी घोडेगाव परिसरात राहणारे असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या मार्फत कोणी तरी हा हल्ला घडवून आणला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या मागे तालुक्यातील राजकीय कारण असल्याचाही संशय व्यक्त होत आहे.

टीम झुंजार