
धुळे : बाहेरगावी असलेल्या लग्नाबाबत विचारणा करण्यासाठी कॉल केल्यानंतर तो कॉल कट न करता सुरु राहिल्याने चौघांचा जातीय विद्वेष चव्हाट्यावर आला याबाबत समोरील व्यक्तिने कॉल रेकार्डींगच पोलिसांत सादर केल्याने चौघांवरॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत प्रशांत दिलीप पटाईत यांनी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार , दि . २२ रोजी बाहेरगावी लग्नाला जात असताना मयूर मोरे याचा कॉल आला . त्याने लग्न कोठे आहे , केव्हा आहे अशी विचारणा केली तसेचआम्हीही लग्नाला येण्यासाठी मागाहून निघालो असल्याचे सांगितले . मोबाईलवर बोलणे झाल्यानंतर दोघांनीही कॉल कट न करताच तसेच खिशात ठेवले. त्यानंतर मयूर मोरे व चौघांमध्ये लग्नाच्या विषयावर तसेच जातीवाचक उलट – सुलट बोलणे सुरु झाले. कॉल कट न झाल्याने त्यांचे हे सर्व संभाषण कॉल रेकॉर्डरमध्ये ध्वनिमुद्रित होत होते सुमारे १५ मिनीटे ४५ सेकंद हा कॉल सुरु होता . या कॉलची रेकॉर्डींग पटाईत यांनी रात्री घरी आल्यानंतर झोपण्याच्यावेळी शांतपणे ऐकली.
तेव्हा मयूर मोरे याच्यासोबत असलेल्या चौघांचा गुन्हा जातीय विद्वेष चव्हाट्यावर आला या रेकॉर्डींगमध्ये मयूर याने जातीवाचक तसेच महिलांबाबत आक्षेपार्ह विधान केले असून त्यास सोबत असलेले तिघेजण समर्थन देताना स्पष्ट होत आहे . त्यामुळे दिलीप पटाईत यांनी ही रेकॉर्डींग थेट शहर पोलिस ठाण्यात सादर करत फिर्याद दाखल केली केली त्यानुसार मयूर मोरे ( भोई ) , बंटी विजय मोरे दोन्ही रा. भोईवाडा , मोगलाई, धुळे, कैलास सुकदेव मोरे, मनोज मोरे दोन्ही रा.एकतानगर, साक्री रोड, धुळे या चौघांविरुध्द अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ३ ( १ ) ( यू ) . ३ ( १ ) ( व्ही ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
जातिवाद्यां विरोधात आंबेडकरी महिला पुरुष आक्रमक झाले आहेत.