
यवतमाळ : आपण कथांमध्ये ऐकतो की लोक कोणत्यातरी देवतेला प्रसन्न करण्यासाठी माणसांचा बळी देत असत. पण आजही हे दुष्कृत्य सुरूच आहे, असेच एक प्रकरण यवतमाळ जिल्ह्यातुन समोर आले आहे, ज्यात एक बाप आपल्याच 18 वर्षीय मुलीचा मानवी बळी देण्यास तयार झाला होता. याप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, बाभूळगाव तहसीलमध्ये सोमवारी घडलेल्या घटनेच्या संदर्भात पोलिसांनी पीडितेचे वडील, 1 तांत्रिक आणि इतर 7 जणांना अटक केली आहे. यवतमाळचे पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी सांगितले की, एका आरोपीला दोन मुली आहेत. त्यापैकी एकावर त्याने लैंगिक अत्याचार केला आणि मोठ्या मुलीला धमकावले.
दफनासाठी घरात खड्डा खोदला.
पोलिसांनी सांगितले की, विद्यार्थिनी अभ्यासासाठी नातेवाईकाकडे राहायची आणि नुकतीच मदनी गावात तिच्या घरी आली होती. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने गेल्या काही दिवसांपासून घरी तांत्रिक विधी करण्यास सुरुवात केली होती आणि 25 एप्रिल रोजी आपल्या मुलीला पुरण्यासाठी घरात खड्डा खणला होता.
मित्राने दिली पोलिसांना माहिती :-
पोलिसांनी सांगितले की, पीडितेने तिच्या मित्राला या विधींची माहिती दिली आणि नंतर त्या मित्राने पोलिसांना माहिती दिली आणि सावध केले. या संदर्भात कलम 307 (हत्येचा प्रयत्न), 376 (बलात्कार) आणि आयपीसीच्या इतर संबंधित तरतुदी आणि इतर कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.