समाजाबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या मयुर मोरे व त्याच्या साथीदारावर अँट्रासिटी ॲक्ट नुसार न्यायालयात जलद गतीने खटला चालवा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया -आंबेडकर चे निवेदनाद्वारे मागणी

Spread the love


धुुळे :- दि- २२ एप्रिल रोजी बाहेर गावी लग्नाला जात असताना समाज कंटक समाजात तेढ निर्माण करणाऱ्या मयुर मोरे व त्याच्या साथीदारांनी दलित समाजाविषयी व महिला विषयी जो गलिच्छ भाषेत जे वक्तव्य केले आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात भरात पडसाद उमटले आहे. तरी पोलीस अधीक्षक साहेबांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष मा.दिपक भाऊ निकाळजे यांच्या आदेशावरून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की यांच्या वरील अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार दाखल असलेला खटला न्यायालयात जलत गतीने चालविण्यात येऊन यांना लवकरात लवकर शिक्षा सुनावण्यात यावी व आरोपींना वेळी वेळी मदत करणारा पोलीस कर्मचारी राहुल गिरी यांची चौकशी करून यांना पण सहआरोपी करण्यात यावे अशी मागणी निवेदन मार्फत करण्यात आली आहे.


यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया – आंबेडकर चे दिनेश राज निकुंभ, किरण आप्पा पवार, नितीन ( पप्पू) पाटोळे, राहुल भामरे, मनोहर बैसाणे , उमेश कढरे , स्वप्नील मोहीते , आकाश सोनवणे, सुनील काळे, महेश खैरनार व इतर पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

टीम झुंजार