धक्कादायक…! मांत्रिकानेच विष दिल्याने ‘त्या’ नऊ जणांचा मृत्यू ; सांगलीतील वनमारे कुटुंबाची आत्महत्या नव्हे हत्याच
म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. गेली ७ ते ८ दिवस पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात १९ आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर ३०२ कममान्वये गुन्हे दाखल केले आहेत
सांगली :- म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे. बरोबर आठवड्याभरापूर्वी म्हणजेच २० जून रोजी म्हैसाळमध्ये वनमोरे कुटुंबातील ९ लोकांचं मृत्यू प्रकरण समोर आलं होतं. या घटनेने सांगलीसह संपूर्ण राज्य हादरलं होतं.
धक्कादायक! एकाच कुटुंबातील नऊ जणांची सामूहिक आत्महत्या.https://zunjaar.com/?p=7727
सांगलीचे पोलीस अधिक्षक प्रवीण गेडाम काय म्हणाले?
म्हैसाळ येथील वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे पोलीस तपासांत समोर आले आहे. गेली ७ ते ८ दिवस पोलिस याप्रकरणाचा कसून तपास करत होते. अखेर प्रकरणाच्या मुळाशी जाण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणात १९ आरोपी अटकेत आहे. पोलिसांनी आरोपींवर हत्येचं ३०२ कममान्वये गुन्हे दाखल केले आहेत. २ आरोपींनी विषारी औषध दिलं. बाकी गोष्टी तपासात निष्पन्न होईल, अजूनही चौकशी सुरू आहे, अशी माहिती सांगली पोलीस अधिक्षक प्रवीण गेडाम यांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण ?
म्हैसाळ येथील पशुवैद्यकीय डॉक्टर असणारे माणिक वनमोरे व त्यांचे शिक्षक बंधू पोपट वनमोरे, या दोघांनी आपली आपल्या आई, पत्नी व मुलांच्या समवेत सामूहिक आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. या घटनेने संपूर्ण राज्यात एकाच खळबळ उडाली आहे. दोन्ही कुटुंबांनी आपल्या घरामध्ये एकाच वेळी विष पिऊन आत्महत्या केली असावी, अशी अटकळ बांधली गेली. घटनास्थळाची परिस्थिती पाहिल्यानंतर अनेकांकडून अनेक प्रश्न देखील उपस्थित करण्यात येत होते. नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने झाली, हा घातपात आहे, की नेमकी आत्महत्या की आणखी काय आहे? याबाबत अनेक तर्कवितर्क देखील व्यक्त करण्यात येत होते. वनमोरे बंधूंवर कोट्यवधी रुपयांचं कर्ज झाले होते. या कर्जाच्या वसुलीचा तगादा आणि सावकारीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं बोललं जात होतं.
मृतांमध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय 52), संगीता पोपट वनमोरे (वय 48), अर्चना पोपट वनमोरे ( वय 30), शुभम पोपट वनमोरे (वय 28), माणिक यल्लाप्पा वनमोरे (वय 49), रेखा माणिक वनमोरे (वय 45), आदित्य माणिक वन (वय 15) अनिता माणिक वनमोरे (वय 28) आणि अक्काताई वनमोरे (वय 72) या नऊ जणांचा समावेश आहे.
पण आता म्हैसाळ सामूहिक आत्महत्याप्रकरणी पोलिस तपासातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वनमोरे कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या केली नसून त्यांना विषारी औषध घालून मारल्याचे समोर आले आहे. सांगलीचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
आत्महत्या नव्हे हत्याच
20 जून रोजी वनमारे बंधूंच्या आत्महत्येनं संपूर्ण म्हैसाळ गाव हादरुन गेलं होतं. 9 जणांचे मृतदेह घरात निपचित पडल्याचं समोर आल्यानंतर गावकरी हादरुन गेले होते. डॉक्टर आणि शिक्षक बंधूंची आत्महत्या झाली असल्याचं समजताच संपूर्ण सांगली हादरलेली. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.